पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून चांगलाच दिसाला मिळाला होता. तसेच पुण्यातील तापमानात चांगली वाढ झाली आहे. पुढील २ ते ३ दिवस पुण्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पुण्यासह अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनी पुढील २ दिवस उन्हापासून काळजी घेण्याला सल्ला हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान अंदाज विभागाचे माजी प्रमुख अनुपम कश्यपी यांनी पुणे शहरात येत्या २ दिवस पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
‘पुण्यातील उष्णतेच्या लाटेची स्थिती हळूहळू पावसात घट होईल. महाराष्ट्रात आता दोन दिवस पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि तो प्रामुख्याने राज्याच्या दक्षिणेपर्यंत मर्यादित राहील. त्यामुळे पुण्यातील तापमानात वाढ आणि उष्णतेची लाट निर्माण होणार आहे’, असे अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे.
बुधवारी पुण्यातील अनेक भागांनी ४० अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली. जी गेल्या काही दिवसांपासून शहरात नोंदवण्यात आलेल्या ३६-३८ अंशावरून स्थिर वाढ झाली आहे. शिवाजीनगर येथे कमाल तापमान ४०.६ अंश तर कोरेगाव पार्क येथे ४२.३ अंश नोंदवले गेले. त्याचप्रमाणे राजगुरुनगर येथे ४३.९, तळेगाव ४३.८, पाषाण येथे ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पोलीस महानालायक असतातच…’; पुणे अपघातावरुन केतकी चितळे पोलिसांवर संतापली
-ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देणाऱ्या ममता बॅनर्जींना कोलकाता न्यायालयाची चपराक; बावनकुळे म्हणाले,…
-कल्याणीनगर अपघाताचा पुणे वाहतूक पोलिसांनी घेतला धसका; शहरात अनेक भागात नाकाबंदी अन्..
-बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी वकिलांचा नवा कांगावा; युक्तीवादात म्हणाले, ‘गाडी बिघडलेली…’