पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी उशिरा पुणे, शिरुर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड या ५ मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकसाठी शिरुरच्या जागेसाठी वंचितने जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे.
शिरुरमध्ये महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे तर महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. त्यातच आता मंगलदास बांदल यांनी या निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने आता शिरुरचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे. मंगलदास बांदल हे शिरुरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते, मात्र २०१९ला त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून उमेदवारी मिळेल त्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विडा उचलला होता.
मंगलदास बांदल यांनी मतदारसंघात चांगला जनसंपर्क ठेवला. तसेच उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस या बड्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या मात्र तरीही उमेदवारी मिळाली नाही. महायुती, महाविकास आघाडीत जागावाटपावरुन काही अलबेलं सुरु होतं त्यामुळे मंगलदास बांदल यांनी वंचितसोबत संपर्क वाढवून उमेदवारी मिळवली. त्यामुळे आता शिरुरमध्ये मंगलदास बांदल, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे अशी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे.
अविनाश भोसिकर-नांदेड (लिंगायत), बाबासाहेब भुजंगराव उगले-परभणी (मराठा), अफ्सर खान-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (मुस्लिम), वसंत मोरे-पुणे (मराठा), मंगलदास बांदल-शिरुर (मराठा), अशी वंचित आघाडीच्या ५ उमेदवारांची नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘विकासकामे करणे म्हणजे एक्टिंग करण्यासारखं नाही’; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा
-Pune Lok Sabha Election | पुण्यात वसंत मोरे तर बारामतीत सुप्रिया सुळेंना राहिल पाठिंबा
-Big Breaking: अखेर तात्यांना ‘वंचित’कडून पुणे लोकसभेची उमेदवारी; मोहोळ, धंगेकरांपुढे मोठं आव्हान?
-Baramati Lok Sabha | ताई-वहिनींच्या लढतीत बेहनजींची एन्ट्री; बारामतीत देणार उमेदवार