पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच अनेक वर्षांचं राजकीय वैर असलेले दोन दिग्गज नेते आज पुण्यात एका मंचावर पहायला मिळणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात १५ वर्षे एकत्रित सत्ता असताना देखील पुण्यात काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात टोकाचं वैर होतं. आता हेच दोन्ही नेते पुण्यात एकत्र आल्याचे पहायला मिळणार असल्याने राजकीय वर्तुळा मोठी चर्चा सुरु आहे.
गेल्या अनेक वर्षांत पुण्यात माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिवलच्या कार्यक्रमांना अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असतानाही कधीच उपस्थित राहिले नाहीत. मात्र आता ३६ व्या पुणे फेस्टिवलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अजित पवार हजेरी लावणार आहेत.
पुणे फेस्टिव्हल’ची ३६व्या पुणे फेस्टीव्हलचे उद्घाटन शुक्रवारी (१३सप्टेंबर) दुपारी ४:३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार छत्रपती शाहू महाराज यांचीही उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला अजित पवारांच्या उपस्थितीने राज्याच्या राजकारणात काय परिणाम होणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मायक्रोसॉफ्ट’ने पुण्यात खरेदी केली ५२० कोटींची जमीन; आता कोणता प्रकल्प उभारणार?
-पुणेकरांना ‘वंदे भारत’ची पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार; नेमकं कारण काय?
-‘दिलीप मोहितेंना आमदार करा, लगेच लाल दिव्याची गाडी देतो’; अजित पवारांच्या वक्तव्यावरुन खळबळ
-जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती
-गणरायाचे दर्शन अन् विधानसभेची साखरपेरणी, श्रीनाथ भिमाले थेट पोहचले ‘सागर’ बंगल्यावर