पुणे : एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. तर दुसरीकडे पुणे शहरामध्ये गुन्हेगारी थांबताना दिसत नाही. राज्य शासनाने गुटखा वाहतूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. तरी देखील पुण्यातील रास्ता पेठ परिसरात लाखो रुपयांच्या गुटख्याचा साठा सापडला आहे. अमली पदार्थावर बंदी असताना देखील गुटख्याचा साठा करून छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याचे समजताच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे.
मुदसर इलियास बागवान (वय ४०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) आणि अन्वर शरफुद्दिन शेख (वय ३८, रा. कोंढवा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नाव असून या दोघांकडून तब्बल १० लाख ८४ हजार ७१६ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. बागवान आणि शेख या दोघांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात सिगारेट, अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादने, अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर रास्ता पेठ परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक नितीनकुमार नाईक हे गस्त घालत होते. यावेळी त्यांना रास्ता पेठे परिसरातील एका सोसायटीत दोघांनी गुटखा, पानमसाल्याचा साठा करून ठेवल्याची माहित मिळाली असताना पथकाने सापळा रचत या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर अमली पदार्थ विरोधी पथक सतर्क झाले असून विविध ठिकाणी छापे टाकत असल्याचे बघायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपचं ठरलं! ४ मतदारसंघात विद्यमानांना पसंती, पण कॅन्टोन्मेंट अन् कसब्याचं काय?
-काकांचा पुतण्याला आणखी एक मोठा धक्का; विलास लांडेंचं तुतारी फुंकणं फिक्स, कोणी केली घोषणा?
-‘आमचं आयुष्य उद्ध्वस्त करुन ते…’; सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणाकडे?
-पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय
-पंतप्रधान मोदींची सभा नाही, पण मैदानाची चांगलीच दुरावस्था झाली