पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचाराची रणधुमाळी वाढली आहे. त्यातच राज्यातील सर्वात चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी शिरुर मतदारसंघात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल म कोल्हे यांच्यात लढत होणार असून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. त्यातच आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यातील हा दुसरा निवडणुकीचा सामना रंगला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. मात्र एकामंचावर आल्यावर दोन्ही नेते एकमेकांच्या पाया पडल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.
शिरुर मतदारसंघामध्ये आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे हे दोन्ही नेते अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अमोल कोल्हे हे शिवाजीराव आढळराव यांच्या पाया पडले. यानंतर शिवाजीराव आढळराव हे देखील अमोल कोल्हे यांच्या पाया पडल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.
दरम्यान, आपापल्या प्रचारसभांमधून एकमेकांवर आगपाखड करणारे आढळराव आणि अमोल कोल्हे एका मंचावर आल्यावर एकमेकांच्या पाया पडले आणि शेजारीशेजारी बसून बराच वेळ गप्पा मारताना देखील दिसले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“केंद्र सरकारने मागील १० वर्षात पुण्यासाठी भरपूर काही दिलंय”- मुरलीधर मोहोळ
-‘सून घरची लक्ष्मी, सून घरात आल्यावर सासूला सुनेच्याच हातात चाव्या द्याव्या लागतात’- अजित पवार
-‘आमच्यावर टीका केल्याशिवाय मोदींंना झोपच लागत नाही’; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका