पुणे : पिंपरी-चिंचवड शहर हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून मानले जात होते. मात्र याच पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्य अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रश्न राहिला तो शहराध्यक्ष पद कोणाला द्यावे याचा. यावरुन अजित पवार गटामध्ये निर्माण झालेला तिढा गेल्या पंधरा दिवसांपासून सुटलेला नाही.
शहराध्यपदासाठी असलेल्या प्रबळ दावेदारांना आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेससमोर शहराध्यपदाचे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भोसरी विधानसेची जागा ही महायुतीमध्ये भाजपची असेल असा समज करुन अजित गव्हाणे यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर समर्थक नगरसेवकांसह शरद पवार गटामध्ये प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे पक्षात पडझड होऊ नये, म्हणून अजित पवारांनी पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांची पुण्यात बैठक घेतली. पण या बैठकीवर शरद पवारांनी दुसऱ्या दिवशी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्याने पाणी फेरले. आणि अजित पवारांच्या शहराध्यक्षांनी अनेक माजी नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीची कास धरली.
महिला, युवक आघाडी, विविध सेलचे पदाधिकारी अजित पवारांसोबत असून, शहराच्या अध्यक्षपदासाठी काही नावे समोर आली आहेत. त्यांपैकी कोणाला अध्यक्ष करायचे याची चाचपणी सध्या सुरु आहे. लवकरच अध्यक्षाची नियुक्ती केली जाईल, असे अजित पवार यांनी १० दिवसांपूर्वीच सांगितले. मात्र, अद्याप शहराध्यक्षाची नियुक्ती झालेली नसून पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्ष पदाची धुरा अजित पवार कोणाच्या हाती देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांविरोधात शरद पवारांची खेळी; ‘या’ तरुणांना मिळणार तुतारीकडून संधी
-पुण्यात क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोर; हवामान खात्याकडून अलर्ट जारी
-Hadapsar: लोकसभेच्या विजयाने महाविकास आघाडीची गाडी जोरात, महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच
-मावळच्या जागेवर बाळा भेगडेंचा दावा; अजित पवारांच्या आमदाराची नाराजी, म्हणाले, ‘महायुतीचे वरिष्ठ…’