पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे नेहमीच आपल्या साध्या राहणीमानामुळे चर्चेत असतात. त्यांच्या साध्या राहणीमानाचा प्रत्यय आज कोथरुडकमध्ये पहायला मिळाला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील किनारा हॉटेल येथील श्रमिकांसोबत नाश्त्याचा आनंद घेत संवाद साधला आहे.
राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक राजकीय नेते, मंत्री हे राजकारणी अनेक वर्ष राजकारण करतात, निवडून येतात, लोकांची कामे करतात परंतु काही नेते, मंत्र्यांचं राहणीमान हे अगदी सर्वसामान्य जनतेप्रमाणेच असते. चंद्रकांत पाटलांचेही साधी राहणीमान अनेकदा दिसून आली आहे. कधी ते शासकीय कामकाजाला विलंब नको, म्हणून रेल्वे स्टेशनवरील मालाच्या पोत्यांवर बसून फाईलींवर स्वाक्षरी करुन कामे मार्गी लावताना दिसतात. तर कधी चहाच्या टपरीवर सर्व सामान्यांप्रमाणे चहाचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात.
आज ही त्यांच्या साध्या राहणीमानाचा कोथरुडकरांना प्रत्यय आला. कोथरुड मधील किनारा हॉटेल चौक येथे जमणाऱ्या श्रमिकांसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रेमाची न्याहारी उपक्रम सुरू केला आहे. रोज सकाळी असंख्य श्रमिक बांधव या उपक्रमाचा लाभ घेत असतात. आज चंद्रकांत पाटील हे या श्रमिकांसोबत न्याहारीचा आस्वाद घेताना पहायला मिळाले आहेत.
“माझ्या गुरुंनी सेवा हाच खरा धर्म असल्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे श्रमिक बांधवांसाठी प्रेमाची न्याहारी उपक्रम सुरू केला आहे. आगामी काळात श्रमिक बांधवांच्या उत्तम आरोग्यासाठी तपासणी केंद्र सुरु करण्याचा मानस आहे. त्यासोबतच पुणे आणि आसपासच्या भागात श्रमिक बांधवांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन यात्रा सुरू करत आहे. यासोबत श्रमिक बांधवांना आपल्या विविध कामांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करता यावी, यासाठी मोफत ईसेवा केंद्र देखील कार्यान्वित केले जाईल”, असे चंद्रकांत पाटलांनी जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या स्वागताला हजेरी ते गाडीतून प्रवास, आढळराव पाटलांचं पक्क ठरलंय?
-महायुतीत मतभेद; चंद्रकांत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
-“मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल”; अजित पवारांनी उडवली अशोक पवारांची खिल्ली
-पुण्यात महायुतीची महत्वाची आढावा बैठक; खोत, जानकरांना निमंत्रण नाही