शिरुर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी जोमाने प्रचार केला आहे. त्यातच कोल्हे हे आज करंदी गावात प्रचारासाठी गेले असता एका मतदाराने अमोल कोल्हेंना थेट सवाल केला की, ‘तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं? याचं उत्तर द्या’ यावरुन आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंना चिमटा काढला आहे.
‘शिरुरमधील सगळ्याच गावात अशीच परिस्थिती आहे. अशा खासदारांना विकासासाठी रुपयादेखील दिला नसेल, तर असा माणासाला मतदान करताना १०० वेळा विचार करावा’, असा सल्ला आढळराव पाटलांनी गावकऱ्यांना दिला आहे. आढळराव पाटलांनी आज शिरुर लोकसभा मतदार संघातील अनेक गावात भेटी देत त्यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना त्यांनी अमोल कोल्हेंना खोचक टोला लगावला आहे.
“करंदी तालुक्यात अमोल कोल्हेंची सभा सुरु होती. ही सभा सुरु असताना अमोल कोल्हेंना एकाने भरसभेत उठून प्रश्न विचारला. आढळारावांनी गावासाठी वेगवेगळ्या योजने अंतर्गत १५ कोटी पाच वर्षात दिले. त्यांचा पराजय करुन अमोल कोल्हेंना गावात लीड दिलं. असं म्हणत अमोल कोल्हेंचं ग्रामस्थांनी भाषण अडवलं. हीच परिस्थिती अनेक गावांमध्ये आहे. अशा खासदारांना विकासासाठी रुपयादेखील दिला नसेल तर असा माणासाला मतदान करताना १०० वेळा विचार करावा”, असं म्हणत आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना डिवचलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चर्चा व्हिजनची, धंगेकर मात्र रमले वैयक्तिक टीकेत, पुण्याच्या व्हिजनवर नेली वेळ मारून