पुणे : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत जगदाळेंचा पक्षप्रवेश झाला. यावेळी बोलताना शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यावर सडकून टीका केली.
“इथं आपण एकाला निवडून आणलं तिकीट दिलं मंत्री केलं पण त्यांनी काम केलं नाही. वैयक्तिक फायदा केला, त्यामुळे त्यांना बाजूला करा. उद्याच्या लोकसभा निवडणुकीत याबाबत तुम्ही निर्णय घ्या. देशात सुप्रिया सुळे यांचे काम आहे. संसदेत पहिल्या दोन खासदारांच्या त्या आहेत”, असे शरद पवार म्हणाले आहेत.
“यामुळे तुतारी लक्षात ठेवा नवीन चिन्ह आहे. सगळीकडे पोहोचवा ज्यांचा सहकारी संस्थेत चांगला लौकिक आहे, असे आप्पासाहेब जगदाळे आपल्याकडे आले आहेत. देशात लोकसभा निवडणूक आहे यावेळी लोकांची मनस्थिती वेगळी आहे. काल मी साताऱ्याला होतो. शशिकांत शिंदे यांचा अर्ज भरला, तेव्हा २० हजार लोक उन्हात उभे होते. हेच चित्र सगळीकडे आहे. आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही असं चित्र आहे”, असे शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
–श्री राम नवमी! रामनवमी का साजरी केली जाते? काय आहे यामागचे कारण? जाणून घ्या…
-हद्द झाली टीकेची पातळी घसरली! धंगेकरांची थेट दिवंगत गिरीश बापटांवरच टीका; म्हणाले…