पुणे : गेल्या वर्षात तीव्र उन्हाळा आणि भीषण दुष्काळाची परिस्थिती ओढवली होती. मात्र, यंदा पावसाने दमदार हजेरी लावलेली पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पावसाला सुरवात झाली असून एक महिना संपण्यापूर्वीच वार्षिक सरासरीच्या जवळपास निम्मा पाऊस पडला आहे. शहरात गेल्या काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरात चांगलेच पाणी साचले होते. शनिवारी शिवाजीनगर येथे ११७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
पुणे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून जून महिन्याच्या सरासरीच्या जवळपास ६४ टक्के पाऊस एकाच दिवसात पडला होता. मात्र, या वर्षी आतापर्यंत सुमारे ३१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी पडलेल्या पावसामुळे पावसाळाच्या सुरवातीलाच शहरात वार्षिक पावसाची नोंंद झाली आहे.
शहरात शनिवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली. शहराच्या अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. अनेक घरांमध्ये कंबरेपर्यंत पाणी साठले होते. त्यामुळे याचे खापर खासदार मेधा कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनावर फोडले आहे. त्याबाबतचे निवेदन मेधा कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बूथवरचा कार्यकर्ता ते केंद्रात मंत्री, मुरलीधर मोहोळ यांची मोदी सरकारमध्ये वर्णी; आजच शपथविधी
-पुण्याचे खासदार होताच मुरलीधर मोहोळांनी दिला पुणेकरांना ‘हा’ शब्द
-‘अजितदादांकडे ५५ गायींचा गोठा’, ‘तुतारीवाले गोठा साफ करायला’; उत्तम जानकर- मिटकरी यांच्यात जुंपली
-पालिकेचा आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा आला समोर; ग्रेडसेपरेटरसाठी खोदलेल्या खड्ड्यात 4 मुली बुडाल्या
-सुनील शेळकेंनी सांगितलं बारणेंचं मताधिक्य कमी होण्याचं नेमकं कारण; म्हणाले…