पुणे : ‘द इंडियाज गॉट लेटेंटे’ हा शो चांगलाच चर्चेत राहिला. कारण या शोमध्ये प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने कुटुंबियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तो अडचणीत आला होता. रणवीर अलहाबादियावर मुंबई आणि आसाम राज्यात गुन्हा दाखल झाला होता. न्यायायलायचा पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या सर्व शोवर बंदी घालणयात आली होती. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाचा रणवीर अलहाबादियाला दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत रणवीर अलाहाबादियाच्या वतीने त्याचा पॉडकास्ट कार्यक्रम पुन्हा सुरू करू द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला दिलासा दिला असून त्याचा पॉडकास्ट शो पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या अटकेलाही स्थगिती मिळाली आहे. मात्र, शो पुन्हा सुरु करण्यावर काही महत्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
‘मूलभूत अधिकार हे अनिर्बंध नाहीत, त्यावर काही मर्यादा आहेत. सध्या याचिकाकर्त्याच्या ‘शो’वर बंदी घातलेली आहे. पॉडकास्ट सादर करताना नैतिकता, सभ्यता आणि शालीनतेचे पालन केले, जेणेकरून कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक हा ‘शो’ पाहू शकतील, असे हमीपत्र याचिकाकर्ता देत असेल तर त्यांना शो पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देता येईल’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याच्या ‘शो’साठी २८० कर्मचारी काम करतात. शो बंद झाल्यास त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होईल, असे याचिकेतून सांगितले गेले आहे.
शो प्रदर्शित करण्यासाठी नियमांची पूर्तता करणे आवश्यक
‘शो’मध्ये सभ्यतेचे नियम पाळले जावेत.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत काही नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले.
जे संविधानाच्या कलम १९ (४) अन्वये देण्यात आलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराला बाधा आणणार नाहीत.
केंद्र सरकारने असा काही मसुदा तयार केल्यास तो सार्वजनिक करावा, जेणेकरून या विषयाशी संबंधित लोक त्यावर सूचना आणि हरकती नोंदवू शकतील.
त्याच्यावर कायदा किंवा न्यायिक मोहोर उमटली जावी.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार: तपासात दररोज नवे खुलासे; पुणे पोलिसांचा घेतला ‘हा’ मोठा निर्णय
-लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी, मार्चचा हफ्ता कधी जमा होणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची महिती
-लॉजवर महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा अन् मग… पोलिसांनी नराधम दत्ता गाडेची कुंडली काढली
-काय करायचं ते कर पण… स्वारगेट प्रकरणात धक्कादायक माहिती, पीडितेने जबाबात सगळं सांगितलं
-स्वारगेट अत्याचार प्रकरणी महिला आयोगाची महत्वाची बैठक; चाकणकर काय म्हणाल्या?