पुणे : भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरात मोठी गर्दी पहायला मिळणार आहे. त्यामुळे पुणे महानगर परिवहन मंडळाने हा उत्सव सुरळीत पार पडावा या उद्देशाने अनेक बसमार्गांमध्ये बदल केला आहे. पुणे शहरासह पिंपरी- चिंचवड शहरातील मुख्य गर्दीच्या मार्गांवरील बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
पुणे स्थानकाजवळील बोल्हाई चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पुणे स्टेशन आगर जे. एन. बसस्थानक, ससून रोड आणि मोलेदिना बसस्थानकातून पर्यायी मार्गाने बसेस वळविण्यात येणार आहेत. विशेषत: नेहरू मेमोरियल हॉल, अलंकार चौक आणि पुणे स्टेशन आगर जे. एन. बसस्थानक परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी या मार्गबदलाची माहिती ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी होती. या भागात होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी सकाळी सहापासून रात्री गर्दी ओसरेपर्यंत वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
वाहतूक बदल पुढीलप्रमाणे :
मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकापासून जिल्हाधकारी कार्यालयाकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक शाहीर अमर शेख चैाकातून वळविण्यात येणार असून, वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) चौकातून इच्छितस्थळी जावे लागणार आहे. मुख्य टपाल कार्यालय परिसरातून (जीपीओ) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. जीपीओ चौकातून बोल्हाई चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी नेहरु मेमोरिअल हॉल चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. पुणे स्टेशनकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार असून, वाहनचालकांनी अलंकार चित्रपटगृह चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार असून, वाहनचालकांनी १५ ऑगस्ट चौक, कमला नेहरु रुग्णालय, पवळे चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. रास्ता पेठेतील बॅनर्जी चौकातून शाहीर अमर शेख चौकाकडे जाणारी वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी नरपरतिगी चौक, पंधरा ऑगस्ट चौक, कमला नेहरु चौक, पवळे चौक, कुंभारवेस चैाकातून इच्छितस्थळी जावे.
महत्वाच्या बातम्या-
-सुनेत्रा पवारांची प्रचारसभा घेणार का? राज ठाकरे म्हणाले, ‘मी महायुतीच्या …’
-सुनेत्रा पवारांचे मोठे विधान! म्हणाल्या, “माझी उमेदवारी ही….”
-अन् शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाबाबत विचारताच सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर
-“नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही” सुनेत्रा पवारांनी पिंजून काढला लोकसभा मतदारसंघ