पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकामधील शिवशाह बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली. त्यानंतर या घटनेवरुन सर्वच स्तरातून संंतापाची लाट उसळत आहे. शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाने महत्वाची पाऊले उचलली आहेत.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे शहर आणि जिल्ह्यातील माता-भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जिल्हाधिकारी, PMPML, MSRTC यांचे बस स्थानक प्रमुख, पोलीस अधिकारी, महानगरपालिका अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. सर्व बस स्थानकांमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळी दिल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी,पीएमपीएमएल च्या एम.डी.श्रीमती दीपा मुधोळ, विभागीय नियंत्रक (DC) एस टी महामंडळ पुणे श्री.पंकज ढावरे,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा बिरासीस,राहुल आवारे (ACP स्वारगेट पोलीस स्टेशन),राधाकृष्ण देवढे(उपमुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.पुणे) उपस्थित होते.
बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली
बसस्थानकातील बंद पडलेल्या बसेस १५ एप्रिलपर्यंत स्क्रॅपमध्ये टाकण्यात येतील.
हिरकणी कक्ष अद्ययावत करणे.
महिला स्वतंत्र चौकशी व सुरक्षा हेल्प डेस्क.
महिलांसाठी विशेष पिंक ऑटो रिक्षांची संख्या वाढवणे.
बसेस पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी. बसस्थानक परिसरात केवळ गरजे पुरत्याच बसेस थांबविण्यात याव्यात.
बसस्थानक परिसर व सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.
टोल फ्री नंबर ११२ चे फलक दर्शनी भागातच असावेत.शाळा काॅलेजमधून १०९८ या टोल फ्री नंबरसंदर्भात जनजागृती बीट मार्शल,दामिनी पथकांची गस्त वाढणार.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार: आरोपीच्या जाबाबातून धक्कादायक माहिती समोर; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
-‘मी अत्याचार केला नाही, आमच्यात सहमतीने संबंध झाले’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा
-स्वारगेट अत्याचार: पुणे पोलिसांनी अखेर आरोपीच्या मुस्क्या आवळल्या; कुठे सापडला दत्तात्रय गाडे?