पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर भागातील शिमला ऑफिस चौकाजवळ पुणे मेट्रोच्या कामाला ४ मे पासून सुरवात होणार आहे. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करुन पुणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शहरातील शिवाजीनगर भागातील वाहतूक मार्ग कसे असतील?
१) वीर चाफेकर चौक-नरवीर तानाजी वाडी-के.व्ही.जोशी रोड चौक-शिमला कार्यालय चौक (एसटी स्टँड रोड) हा एकतर्फी (वन वे) मार्ग कार्यान्वित करण्यात आला आहे. वीर चाफेकर उड्डाणपूल ते शिमला ऑफिस चौकापर्यंत प्रवेश बंद असेल. चाफेकर उड्डाणपूल सर्व्हिस रोडची डावी बाजू चाफेकर चौकाकडे नेणे, नंतर डावीकडे नरवीर तानाजी वाडीकडे वळणे आणि शेवटी थेट शिमला रोड ऑफिस चौकाकडे वळणे हा पर्यायी मार्ग असेल.
२) शिवाजीनगर रेल्वे स्थानकातून एसटी स्टँड सर्कलमार्गे नरवीर तानाजी वाडीपर्यंत प्रवेश निषिद्ध आहे.
३) शिमला कार्यालय चौकातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी एलआयसी कार्यालय व चाफेकर उड्डाणपुलावरून वाहने जावीत.
४) वीर चाफेकर चौक ते नरवीर तानाजी वाडी चौक ते शिमला कार्यालय चौक या रस्त्याच्या दुतर्फा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग.
५) फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोड ते वीर चाफेकर चौकमार्गे शिमला ऑफिस चौकापर्यंत प्रवेश बंदी असेल. वीर चाफेकर चौकातून सरळ जाणे, नरवीर तानाजी वाडी चौकात उजवीकडे वळणे आणि सिमला ऑफिस चौकात जाणे असा पर्यायी मार्ग असेल.
६) नरवीर तानाजी वाडी चौक ते वीर चाफेकर चौकापर्यंत प्रवेश बंदी आहे. नरवीर तानाजी वाडी चौकातून डावीकडे जाऊन थेट शिमला ऑफिस चौकात जावे आणि नंतर उजवीकडे वीर चाफेकर चौकाकडे वळावे, असा पर्यायी मार्ग असेल.
७) एस. जी. बर्वे चौक ते शिमला ऑफिस चौक मार्गे शिवाजीनगर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवेश बंदी आहे. पर्यायी मार्ग – शिमला ऑफिस चौकातून डावीकडे जावे, त्यानंतर वीर चाफेकर चौकातून उजवीकडे आणि नरवीर तानाजी वाडी चौकातून उजवीकडे जाऊन शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर पोहोचावे.
महत्वाच्या बातम्या-
-“कामं करायला पण हिंमत लागते धमक लागते, प्रशासनावर पकड पाहिजे”- अजित पवार
-Baramati | “सासऱ्याचे दिवस राहत नाहीत, कधीतरी सुनेचे दिवस येतील”; अजितदादांचा काकांना टोला
-…म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
-अनर्थ टळला: सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारे आणि पायलट दोघंही सुखरुप