पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात प्रचार करताना दिसत आहे. प्रचारसभांच्या माध्यमातून विरोधी उमेदवारावर सडकून टीका करत आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी टीका केली आहे.
“काहीजण म्हणतात अमुक चोरले तमूक चोरले. पण आमदार, जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे असतात. राज ठाकरे काय बोलतील सांगता येत नाही. कधी असं कधी तसं बोलतात. त्याकडं तुम्ही लक्ष देऊं नका. आम्ही कामाची माणसे, दलबदलु करणारे नाही’, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
“आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मी कधीही जातीभेद करत नाही. मी बोलतो तसं वागतो. पुढे जायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन जावं लागेल. आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा आदर्श घेतो, त्यावेळी जनता देखील विचार करत असते की हे लोक बोलतात तसे वागतात का?, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“जनतेने दाखवलेला हा विश्वास मी निश्चितच माझ्या कार्यातून सार्थ ठरवीन”- हेमंत रासने
-अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर हर्षवर्धन पाटलांचं सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले, ‘निकालातून..’
-लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी: १५०० नाही तर आता मिळणार २१०० रुपये
-‘विकास पाहिजे तर आबाच पाहीजे’ म्हणत आबा बागुलांच्या विकास यात्रेने पर्वती दुमदुमली