बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबातील २ सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. त्यामुळे दररोज पवार कुटुंबाने एकमेकांवर केलेल्या टीका समोर येतात. त्यातच आता सुप्रिया सुळेंनी याबाबत भाष्य केले आहे.
“आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात, अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत पण देणार नाही. अनेक महिने झालं सहन करत आहे, आता जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका. माझ्या आणि रोहितच्या आईवर २ वेळा बोलला ठीक आहे, तिसऱ्या वेळी बोलला, तर करारा जवाब मिलेगा”, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.
“आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही. बारामती म्हणजे शरद पवार असून दुसऱ्यांनी गैरसमज करू नये हे सगळं आमच्यामुळे आहे. विकास सगळ्यांच्या मदतीने होतं असते. कामे फक्त सत्तेतून होतात असे सांगितले, १० वर्ष विरोधात खासदार आहे अनेक प्रकल्पात देशात बारामतीचा पहिला नंबर लागतो. वाराणसीपेक्षा बारामती सगळ्यात पुढं आहे”, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.
“लोकं म्हणतात एका विचाराचा खासदार पाहिजे. विरोधात असले तरी कामे करता येतात. लोकांशी चांगले वागलं की कामे होतात. विरोधी पक्षात आल्यापासून जास्त टाळ्या आता मिळतात. माझा बाप थकला नाही श्रमलेला आहे. सुखाच्या काळात सोबत राहिलो तर रोहित आईसाठी करतोय तसा मुलगा माझा करेल अशी माझी आशा आहे, माझी मुलगी गुणी आहे“,असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील वाहतूकीत ४ मे पासून महत्वाचे बदल; जाणून घ्या कोणते रस्ते बंद, कोणता पर्यायी मार्ग?
-“कामं करायला पण हिंमत लागते धमक लागते, प्रशासनावर पकड पाहिजे”- अजित पवार
-Baramati | “सासऱ्याचे दिवस राहत नाहीत, कधीतरी सुनेचे दिवस येतील”; अजितदादांचा काकांना टोला
-…म्हणून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस