Morning Breakfast : दैनंदिन जीवनात सकाळचा पोटभर नाश्ता हा आपल्या दिवसभराची उर्जा देत असतो. त्यामुळे दररोज पोटभर आणि पोषक नाश्ता करणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. अनेकांना सकाळी नाश्ता करण्याची सवय नसते. किंवा काही कारणास्तव सकाळी नाश्ता करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने नाश्ता करत नाहीत. पण सकाळी नाश्ता न करता दिवसाची सुरवात केल्याने आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होत असतात. सकाळचा नाश्ता दिवसाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा आहार असतो. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनशक्ती सुधारते. असे तुम्ही ज्येष्ठांकडून ऐकलंच असेल. पण सकाळी नाश्ता न केल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात? हे आज आपण पाहणार आहोत.
नाश्ता टाळण्याचे परिणाम आणि त्याचे महत्त्व
1. ऊर्जेची कमतरता
सकाळी नाश्ता न केल्यामुळे दिवसभराची ऊर्जा कमी होऊ शकते. रात्रीच्या जेवणानंतर रात्रभर शरीराने खूप वेळ काही खाल्लेले नसते, आणि त्यामुळे सकाळी शरीराला ऊर्जेची आवश्यक असते. नाश्ता न केल्यास शरीरात थकवा जाणवतो आणि चिडचिडेपणा जाणवू शकतो.
2. पचन समस्या
सकाळी नाश्ता केल्याने पचनशक्ती उत्तम राहते. जेव्हा आपण नाश्ता टाळतो, तेव्हा पचनाच्या प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे गॅस, अपचन किंवा इतर पचनाशी संबंधित समस्यांचा शरीराला सामना करावा लागतो.
3. वजन वाढण्याची शक्यता
सकाळी नाश्ता न केल्याने पोट जास्त वेळ रिकामे राहिल्यामुळे, लंच किंवा डिनरला जास्त आहार घेण्याची प्रवृत्ती वाढते. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
4. मेटाबोलिक कमी होते
नियमित नाश्ता न करण्यामुळे मेटाबोलिक रेट कमी होऊ शकतो, ज्यामुळे डायबिटीज आणि हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता जास्त असते.
5. मनःस्थितीवर परिणाम
काहींना भूक लागलेली समजत नाही. त्यामुळे पोटभर नाष्टा न केल्याने मानसिक संतुलन देखील बिघडू शकते. तसेच चिडचिडेपणा आणि चिंता वाढू शकतात.
शरीराच्या योग्य ऑपरेटिंग सिस्टमसाठी आणि दिवसभरातील ऊर्जा टिकवण्यासाठी नाश्ता हा महत्वाचा आहे. त्यामुळे, सकाळी नाश्ता घेणे आवश्यक आहे, जरी तो हलका असला, तरी तो आपल्या शरीराला आणि मनाला ताजेतवाने ठेवतो. शक्य तितका पौष्ठिक नाश्ता करावा त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते.