पुणे : देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या विद्यमाना खासदार आणि येत्या बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी कांद्याच्या हमीभावावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. “कांद्याला हमीभाव द्या, ही मागणी केल्याने मला आणि खासदार अमोल कोल्हेंना संसदेतून एक दिवसासाठी निलंबित कऱण्यात आलं होतं. ही सरकारची दडपशाही आहे. यंदाच्या निवडणूकीत आम्ही दहपशाहीच्या विरोधात लढणार आहोत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. पुण्यात महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी हजेर लावली होती. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
“संसदेत मी आणि अमोल कोल्हे यांनी कांद्याचा प्रश्न कायम उपस्थित केला. पण याच प्रश्नावरुन आम्हाला संसदेतून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आलं होतं. आम्ही कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य केलं नव्हतं तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. याशिवाय कांद्याला हमीभाव द्या, एवढी साधी मागणी सरकारकडे केली असताना त्यांनी आम्हाला निलंबित केलं होतं. त्यामुळे हे सरकार कायम दडपशाही करत आलं आहे. ही दडपशाही आता चालणार नाही. आमची लढाई ही या दहपशाही विरोधात आहे.”
दरम्यान, सुप्रिया सुळेंसह खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रवींद्र धंगेकर असे महाविकास आघाडीचे उमेदवार देखील उपस्थित होते. “आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे. महात्मा फुले यांनी 1883 मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण महात्मा फुल्यांनी केले आहे त्याला तोड नाही. वर्तमानात यात किंचीतही बदल झालेला नाही. त्यामुळे या चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात हाच असूड उगारण्याची वेळ आली”, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मावळात मोठा धक्का; प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच धरला शिंदेंचा हात
-“फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे…”, ट्रोलर्सवर संतापली अभिनेत्री अमृता खानविलकर
-राज ठाकरेंनी मोदींना दिला बिनशर्त पाठिंबा; त्यावर वसंत मोरे म्हणाले,….