पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीसाठी बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघ अधिक महत्वाचे मानले जातात. बारामतीमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. मात्र शिरुरमध्ये महायुतीच्या उमेदवाराबाबत अद्याप कोणाताही निर्णय घेण्यात आला नाही.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिले गेले. त्यामुळे त्यांचा पत्ता कट करण्यात आला मात्र गेल्या २ दिवसांपासून आढळराव पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यावरुन आढळराव पाटलांना राष्ट्रवादी पक्षांतर केल्यानंतर उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. यावरुन विलास लांडे यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.
“२०१९ मध्ये झालेल्या शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सांगण्यावरून अमोल कोल्हे यांचे मी प्रामाणिकपणे काम केलं. आतादेखील आयात उमेदवाराला उमेदवारी मिळणार असेल, तर काही गोष्टींचा विचार करावा लागेल, असा थेट इशारा भोसरी विधानसभेचे माजी आमदार, शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असणारे विलास लांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.
“गेल्या पंधरा वर्षांपासून मी इच्छुक आहे. २००९ पासून ते आजतागायत शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहे. काही गोष्टी नेत्यांच्या निर्णयानंतर बदलाव्या लागतात. तस वागावं लागतं. आगामी २०२४ शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. यात राजकीय परिस्थिती उलटसुलट झाली आहे”, असंही विलास लांडे यांनी सांगितलं आहे.
“२०१९ ला सुद्धा या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी केली. चार महिने मतदारसंघात फिरलो. वातावरण निर्मिती केली. ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षात अमोल कोल्हे यांची एन्ट्री झाली. त्यांना उमेदवारी देण्यात आली. तरी अजित पवारांच्या शब्दामुळे त्यांचे प्रामाणिकपणे मी काम केले. एवढं सगळं केल्यानंतर आयात उमेदवाराला उमेदवारी देणार असतील तर काही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल”, असा इशारा माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवारांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Metro | पुणेकरांसाठी मेट्रोचा नवा मार्ग होणार खुला; मोदींच्या हस्ते लोकर्पण
-ड्रग्ज प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाचा हात??? चौकशी सुरु
-पिंपरी चिंचवड पोलिसांकडून २ कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त
-पुण्यात पाणी कपात; बुधवारी शहरातील ‘या’ परिसरातील पाणी पुरवठा राहणार बंद
-मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले,”मी अधिकृतपणे सांगतो की एकनाथ शिंदे…”