पुणे : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सर्व पक्षांकडून सुरु असलेल्या तयारीलाही आता वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे दौऱ्यावर होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांना महाविकास आघाडीसोबत घेण्याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळेंनी वेळ मारुन नेत प्रश्नावर गोल-गोल फिरत उत्तर दिले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू हे विरोधकांचा आवाज जोरदारपणे मांडू शकतात. ते तुमच्यासोबत आले तर, महाविकास आघाडीचे बळकट होणार नाहीत का? यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी चांगलीच गिरकी घेतल्याचे पहायला मिळाले. तसेच सुप्रिया सुळे यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.
‘आम्ही सगळे महाराष्ट्राची सेवा, देशाची सेवा करण्यासाठी कामाला लागलेला आहोत. बच्चू भाऊ महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी अपंग, दिव्यांगांसाठी खूप मोठं आणि चांगलं काम केलं आहे. ज्या समाजाकडे कोणाचं लक्ष नव्हतं, अशा समाजाला प्रवाहात आणण्याचं काम बच्चू कडू यांनी केलं आहे. महाराष्ट्रासाठी सर्व चांगल्या लोकांनी एकत्र यावं ही माझी इच्छा आहे. राज्याचं प्रशासन बळकट करण्यासाठी सर्व चांगल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-राज्य मंडळाच्या शुल्क परताव्यात तांत्रिक अडचणी; विद्यार्थ्यांना शुल्क परतावा कधी मिळणार?
-शरद पवार भाजपला धक्का देणार?; भाजपचे संजय काकडे पोहचले शरद पवारांच्या भेटीला
-Pune Drugs: विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात पुन्हा ड्रग्ज प्रकरण उघडकीस
-‘नागपंचमीला गुलाबी रंगाची पुंगी वाजवून…’; अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला
-‘सरकार घाबरलंय त्यामुळे…’; विधानसभा निवडणूक कधी लागणार? जयंत पाटलांनी सांगितला मुहूर्त