पुणे : कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघाताला राजकीय वळण आले आहे. अपघात झाल्यापासून पुणे पोलिसांच्या चौकशीवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर अनेक अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर ट्वीट करत त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे.
कल्याणीनगरमध्ये झालेल्या या अपघात प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रवींद्र धंगेकर आयुक्त कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन करत आहे. तपास आधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला नाही तर मी शहरात विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन करेन, असा इशारा त्यांनी पोलिसांना दिला आहे.
या अपघात प्रकरणात २ एफआयआर काढले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना पुण्यात येऊन पुणेकरांची समजूत काढावी लागली. मात्र २ एफआयआर का काढले? याची माहिती दिली पाहिजे आणि या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणात करोडो रुपयांचा व्यवहार एका रात्रीत झाला आहे. बिल्डरचं पोरगं पिझ्झा पार्टी करतो आणि रेड कार्पेट टाकून पोरगं घरी जातो. पालक पोलीस ठाण्यात मालकासारखे वावरत होते. २ मुलांचा मृत्यू झाल्याची त्यांना खंत किंवा वाईट वाटत नव्हतं. मृतांच्या पंचनाम्यासाठी पोलीस आले नाहीत पण आरोपी मुलगा घरी होता’, असा आरोपही रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“करके बैठा मै नशे, इन माय पोर्शे…”; आरोपी वेदांत अग्रवाल रॅप करत देतोय शिव्या अन् आई म्हणतेय…
-‘पैसे खाल्ल्याशिवाय ‘हे’ होऊच शकत नाही’; रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप
-पुणेकरांनो सावधान! येत्या २ दिवसांत पुन्हा उन्हाचा कडाका वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
-‘पोलीस महानालायक असतातच…’; पुणे अपघातावरुन केतकी चितळे पोलिसांवर संतापली
-ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देणाऱ्या ममता बॅनर्जींना कोलकाता न्यायालयाची चपराक; बावनकुळे म्हणाले,…