पुणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सध्या जागावाटपाबाबच चर्चा सुरु आहेत. त्यातच महायुतीच्या जागावाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाईल, अशी चर्चा आता जोर धरत आहे. २०१९च्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते, आढळराव पाटलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आग्रहानंतर ‘म्हाडा’च्या पुणे मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. म्हाडा अध्यक्षपद स्विकारल्यानंतर त्यांचा शिरुरच्या जागेवरुन पत्ता कट झाल्याचं बोललं जात होतं.
गेली ५ वर्षे मी मतदारसंघात फिरत असून, ही निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवणारच यावर आढळराव पाटील ठाम होते. मात्र जागावाटपाची चर्चा रेंगाळली आणि हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता बळावल्याने आढळराव यांनी उमेदवारीवरून माघार घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आढळराव पाटील राष्ट्रवादीत अजित पवारांसोबत जाणार असल्याचंही बोललं जात होतं. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि आमदारांनी आढळरावांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारीला आयात उमेदवार नको म्हणत थेट नकार दिला आहे. याबाबत आता आढळराव पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.
मला महायुतीचा निर्णय मान्य असेल. राष्ट्रवादीकडून लढविण्यास सांगितल्यास निवडणूक लढवू, असे आढळराव पाटील म्हणाले आहेत. “राष्ट्रवादीच्या आमदारांचा व कार्यकर्त्यांचा विरोध हे अनाकलनीय आहे. विरोध असताना मी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी जाणार नाही”, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘शेळकेंचा अहंकार वाढलाय, मावळची जनता त्यांचा अहंकार नक्कीच उतरवणार’; रोहित पवारांची प्रतिक्रिया
-पुणे-सुरत प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; पुणे-सुरत थेट विमानसेवा लवकरच सुरु होणार
-जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात बससेवा मोफत; पीएमपीएमएलकडून खास गिफ्ट
-‘आम्ही राजकारणात हिशोब करायला आलो नाही’; अमित शहांच्या त्या टीकेवर सुळेंची प्रतिक्रिया
-‘आम्ही शिंदे गटाइतक्याच जागा लढणार’; भुजबळांच्या मागणीवर फडणवीसांचं उत्तर म्हणाले ‘कोणी काहीही…’