पुणे : चौथ्या टप्प्यात होणाऱ्या पुणे लोकसभा निवडणुकीचे मतदान येत्या १३ मे रोजी सोमवारी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर चौथ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचार तोफा आता थंडावल्या आहेत. महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या शहरात जोरदार प्रचार झालेला पहायला मिळाला आहे. मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचा आणखी विकास होण्याचं आश्वासन पुणेकरांना दिले आहे.
पुणे शहर हे वेगाने होणारे महानगर आहे. केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्तेमध्ये असलेल्या पुढील ५० वर्षांचा विचार करुन आम्ही भाजपच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा पाया भक्कम करण्यास सुरवात केली. यातील अनेक प्रकल्पांचे काम आठ ते दहा वर्षे दीर्घकाळ चालणारे आहे. यातील काही प्रकल्प मार्गेही लागले मेट्रो, ई-बस, खरेदी, रेल्वे, विमानतळ, रिंग रोड, मल्टी मॉडेल हब, आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण, स्वच्छ शहर, टेकड्यांवरील वनीकरण, पर्यावरण टिकवण्यासाठी उपाय योजना, समान पाणीपुरवठा योजना, पाण्यासाठी, नवीन रस्ते, आवास योजना, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, कायदा-सुव्यवस्था, उद्योगधंद्यांना प्रोत्साहन आणि शहरांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, वारसा जतन करणे या माध्यमातून मला पुण्याला देशाचे सर्वोत्कृष्ट शहर बनवायचे असल्याचे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
“आपल्या मतांमुळे देशाच्या आणि पर्यायाने पुण्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळणार आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून मला पुणेकरांकडून खूप प्रेम आणि विश्वास मिळाला. यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला आहे. अधिक चांगले सामाजिक राजकीय काम करण्याची प्रेरणा मला मिळाली. मतदारांचा मतरूपी आशीर्वाद मला १३ मे रोजी मिळेल आणि मी विक्रमी मताधिक्याने विजय होईल नव्हे, तर विजयाचे रूपांतर महाविजयात होईल असा विश्वास वाटतो, सर्वांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो”, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘ही देशाची निवडणूक, गल्लीतला नाही तर दिल्लीतला नेता निवडायचाय!’ पुण्यातील सांगता सभेत फडणवीस बरसले
-‘…पण आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत’; अजितदादांचा पुन्हा कोल्हेंवर निशाणा
-‘पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना ऑफर दिली नाही तर…’; देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले
-‘१३ तारखेला विरोधकांचा बाजा वाजणार’; बारणेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड-शो
-‘जे कामाने निवडून येत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात’; नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?