Manson session : राज्याचे विधीमंडळाचे पावसाठी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांंमध्ये तुफान कलगितुरा रंगला होता. त्यातच अधिवेशनामध्ये आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूच्या आमदारांनी अभिभाषणावर आपापली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या अभिभाषणातील ‘१ ट्रिलियनची अर्थव्यवस्था’ या उल्लेखावर आक्षेप घेतला आहे.
“महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करायची आहे हे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे हे राज्यपालांच्या भाषणातच आहे. म्हणजे ते लक्ष्य अवघड आहे हे राज्यपालांनी मान्य केलं आहे. त्यामुळे हा एक ट्रिलियनचा दावा वास्वववादी नाही हे अप्रत्यक्षपणे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे. महाराष्ट्रात सात-साडेसात टक्के विकासदर आहे. तो सतरा टक्के झाला तर २०२७-२८ साली आपण एक ट्रिलियनवर पोहोचू याचं राज्यकर्त्यांना भान आणून देणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या काळात काही एक ट्रिलियन होत नाही. ते व्हावेत यासाठी काही प्रयत्नही होत नाहीत”, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
अर्थसंकल्प काल फक्त मांडलेला आहे, सभागृहाने त्यास मंजुरी दिलेली नाही, चर्चा झालेली नाही. त्यामुळे आजपासून योजना सुरू असे मुख्यमंत्री घोषित करू शकत नाही. ही श्रेयवादाची स्पर्धा आहे का? हक्कभंग दाखल झाला पाहिजे.#पावसाळी_अधिवेशन @NCPspeaks pic.twitter.com/CdBn1DIfrP
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 29, 2024
“वारंवार राज्यपालांच्या भाषणात असे मुद्दे घालून राज्यपालांचीही फसवणूक होत आहे. त्यांना भाषण वाचतानाही वाटत असेल की हे काय लिहिलंय आणि मी हे काय वाचतोय. सध्याचे राज्यपाल फार चांगले आहेत. तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेची चर्चा करा. नाही त्यांनी मी जे सांगतोय ते सांगितलं तर माझं नाव बदलेन मी. त्यांचंही मत हेच असेल. ‘क्या बोल रहे है, क्या लिख रहे है. लेकिन मुझे पढना पड रहा है’ असं ते म्हणत असतील. म्हणतात असा माझा दावा नाही. हा अंदाज आहे”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पावसाळ्यात आपले स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी काय खावे काय टाळावे?
-विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; भाजपच्या ‘या’ नेत्यांची विधान परिषदेवर लागणार वर्णी!
-पुणे ड्रग्ज: शहरातील अनधिकृत पब्ज आणि बारच्या कारवाईवर सौरभ गोखलेची प्रतिक्रिया