पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्य तोंडावरर पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी काल गुरुवारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ९ जुलैला ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे. यावरुन आता पुण्याच्या राजकारणात वेगळंच चित्र पहायला मिळणार आहे. या संदर्भात आज वसंत मोरे शुक्रवारी पुण्यात प्रसारमध्यमांशी बोलत होते.
“मी वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना मेसेज टाकला होता. ‘साहेब मला माफ करा’, असे मी त्या मेसेजमध्ये लिहले होते. मला माझ्या पाठीशी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करणे गरजेचे आहे. त्यानुसार मी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मला प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला होता. पण आता खूप उशीर झाला आहे मी त्यांना ठीक आहे बोललो, पण काल उद्धव ठाकरे यांना भेटलोच”, असे वसंत मोरे यांनी म्हणाले आहेत.
‘कुठल्याही प्रलोभानापोटी मी शिवसेनेत जात नाही. उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती मी पूर्ण करेल. विधानसभा का महानगरपालिका लढवायची हे लवकरच ठरवले जाईल. पक्षांतर्गत काही गोष्टी आणि कार्यकर्त्यांना संधी देणे न देणे, माझ्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार हे सगळे लक्षात घेता वंचित पक्ष सोडला. लोकसभा निवडणुकीत बऱ्याच लोकांनी माझं काम केलं नाही. त्यामुळे माझे कार्यकर्ते सुद्धा नाराज होते. प्रकाश आंबेडकर यांच्याशी या गोष्टी संदर्भात चर्चा झाली होती’, असेही वसंत मोरे यांनी माध्यमांना सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंना ऑफिस फोडण्याची धमकी; पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ
-जेएम कॉर्नर चौपाटी पालिकेकडून जमीनदोस्त; अनधिकृत बांधकामां विरोधात धडक कारवाई सुरूच
-धीरज घाटेंचे राजकीय आचरण मनोरूग्णासारखे, तत्काळ गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी
-वसंत मोरे आता वंचितलाही करणार ‘जय महाराष्ट्र’; पुण्यातील विधानसभेच्या २ मतदारसंघावर केला दावा