बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीत खासदार शरद पवार यांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केली आहे. शरद पवार आजपासून ३ दिवस बारामती दौऱ्यावर आहेत. बारामती मतदारसंघातील सर्व भागात शरद पवार सर्व भागात दौरा करत आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आज बारामतीमध्ये शेतकरी मेळावे झाले. बारामती दौऱ्यावर शरद पवार हे ११ शेतकरी मेळावे घेणार आहेत. त्यातच शरद पवारांनी त्यांचे कट्टर विरोधक असणारे संभाजी काकडे यांची भेट घेतल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
शरद पवार आणि काकडे हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. मात्र शरद पवारांनी निवडणुकीच्या आधीही संभाजी काकडेंची भेट घेतली होती. आणि आता विधानसभा निवडणुकीपुर्वी देखील काकडेंची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. सध्या शरद पवार काकडे कुटुंबासोबत जुळवून घेत आहेत.
शरद पवारांच्या बारामती दौऱ्यांवरुन त्यांनी विधानसभा निवडणुकीची अप्रत्यक्षपणे तयारी सुरु केली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शरद पवारांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे देखील त्यांच्या सोबत होते. त्यातच ‘मी दौरा करत आहे. बारामती लोकसभेत फिरत आहे. अलीकडे मी लक्ष घालत नव्हतो. दुसऱ्यावर जबाबदारी दिली होती पण आता लक्ष घालावे लागेल. ज्याच्याकडे सत्ता आहे. त्यांनी लोकांच्या हिताची कामे केली पाहिजे पण तसे दिसत नाही’, असे शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वारकऱ्यांना सर्व सोईसुविधा द्या, हेमंत रासनेंची पालिककडे आग्रही मागणी; शिष्टमंडळासह घेतली भेट
-‘लोकसभेत आम्हाला एकही जागा नाही, आता….’ विधानसभेच्या किती जागांवर आठवलेंनी केला दावा?
-महायुतीत वाद? रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपला नाही तर…’
-पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
-अजित पवारांना पुन्हा तोंडावर पाडण्यासाठी शरद पवारांचा ‘मास्टर’ प्लॅन; सलग ३ दिवस बारामती दौऱ्यावर