पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावर कोणाचा हक्क हा वाद अद्याप सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. अशातच बुधवारी झालेल्या सुणावणीमध्ये न्यायालयाने घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वापरण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ‘शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ वापरू नका असे तोंडी आदेश दिले असून ‘तुम्ही तुमच्या पायावर उभं राहायला हवं’, असंही सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले असले तरीही अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते शरद पवारांचा फोटो वापरण्यास मनाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तरीही शरद पवारांचे फोटो वापरले जात असल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
“ज्यांनी तुमच्या, माझ्या आणि आपल्या पवार साहेबांचा पक्ष आणि चिन्ह नेले, त्यांच्या विरोधात ही लढाई आहे. न्यायालयाने चार दिवसांपूर्वी त्यांना सांगितले आहे की, स्वतःच्या पायावर उभे राहायला शिका. शरद पवारांचा फोटो वापरायचा नाही. तरीही त्यांनी साहेबांचा फोटो वापरल्याचा पुरावा माझ्याकडे आला आहे. आता तो मी कोर्टात नेणार आहे”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना सुनावले आहे.
‘तुझा जो नेता आहे ना त्याचा फोटो लाव, माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, कुठे तरी निष्ठा ठेव. दोन्ही दगडांवर हात ठेवशील तर पडशील’, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी जुन्नरचे विद्यमान आमदार, महायुतीचे उमेदवार अतुल बेनकेंना टीकेचे लक्ष्य केले आहे. जुन्नरचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारसभेत बोलताना सुप्रिया सुळेंनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-“बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल”
-“देश विश्वगुरु झाला पाहिजे या विचाराने भाजपचे काम”- नितीन गडकरी
-पर्वती मतदारसंघासाठी ‘विकासाची दशसूत्री’ ठरणार दिशादर्शक- आबा बागुल
-“लोकसभेला आडाकडं बघितलं, आता विधानसभेला विहिरीकडं बघा म्हणजे…”- अजित पवार
-कसब्यात हेमंत रासनेंची ताकद वाढली, अखिल भारतीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा