पुणे : पुण्यातील वडगाव शेरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. एका अनोळखी व्यक्तीने भाजीविक्रेत्या महिलेला फोन करत नगरसेवक बोलत असल्याचे सांगितले. ‘मी वडगाव शेरीचा नगरसेवक बोलत आहे. मला तू फार आवडतेस’, असंही हा अज्ञात व्यक्ती म्हणू लागला वारंवार फोन करुन त्रास देऊ लागला. या सर्व प्रकाराला वैतागून महिलेने पोलिसांत धाव घेतली. वय वर्षे ३० असलेल्या महिलेने संबंधित अज्ञात व्यक्ती विरोधात चंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फिर्यादी महिलेचे चंदननगर परिसरात भाजी विक्रीचे शॉप आहे. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत तिच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून वारंवार फोन आले. ‘मला तू आवडतेस, मला तू पाहिजेस, बाकी काही बोलू नकोस, तू फक्त एस ऑर नो मध्येच बोल. मी वडगाव शेरीचा नगरसेवक बोलतोय. माझ्या आवडत्या व्यक्तीचा नंबर मी कसा पण काढू शकतो. यावर फिर्यादीने राँग नंबर आहे, असे सांगितले असता मी मनपाचा नगरसेवक बोलतोय, उद्या येतोच तुझ्या भाजीच्या दुकानावर असे म्हणत फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
भाजी विक्रेत्या महिलेने वारंवार येणाऱ्या या फोनमुळे होणाऱ्या त्रासामुळे पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. घडला प्रकार पोलिसांच्या कानावर घातला त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही व्यक्ती कोणी नगरसेवक नसून डिलिव्हरी बॉय असल्याची माहिती समोर येत आहे. या बाबत अधिकचा तपास आता चंदनगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune: नदीपात्रातील ‘तो’ पूल पाडण्याचा पालिकेचा विचार; नेमकं कारण काय?
-“फडणवीस मुख्यमंत्री होताच राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचं षडयंत्र” माजी खासदाराचा गंभीर आरोप
-पुणे महानगर परिवहन महामंडळाचे खाजगीकरण तात्काळ थांबवा अन्यथा…; प्रमोद भानगिरेंचा इशारा
-पवार काका-पुतण्याच्या भेटीने चर्चेला उधाण, दोघे एकत्र येण्यावर बड्या नेत्याचं मोठं विधान
-…अन् पुण्यातील ‘ त्या’ पबवर गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी स्वतः टाकली होती रेड