पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातनंतर शहरामध्ये चालणारे अवैध पब आणि ड्रग्ज प्रकरण चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. कल्याणीनगर अपघातानंतर अगदी सविस्तरपणे सर्व घटनाक्रम मांडत आवाज उठवणारे रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी सकाळी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पहायला मिळाले आहे.
यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुमचे सर्व आरोप साफ चुकीचे आहेत, असे सांगितले. त्यावर रवींद्र धंगेकरांनी शहरात चालणाऱ्या अवैध पब, बार आणि अंमली पदार्थांची विक्री करणारे कोणत्या पोलिसांना हफ्ते देतात त्या सर्व पोलिसांच्या नावाची यादी धंगेकरांनी वाचून दाखवली आहे.
तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही पापं करताय, तुम्हाला लय समजतं का?, तुम्ही दर महिन्याला ७० ते ८० लाख हप्ता घेता, याची यादी माझ्याकडे आहे. तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता, याची माहिती माझ्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उदध्वस्त केलं आहे, तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, असे लगोपाठ प्रश्न विचारत रवींद्र धंगेकर यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे तुमच्या आशीवार्दाने हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी ४ वाजेपर्यंत कसे चालतात? आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत. आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही. आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.
अत्यंत घृणास्पद प्रकार…
“आरोपीचे ओरिजनल Blood Sample ससुनच्या डॉक्टरांनी कचऱ्यात फेकून दिलेले आहेत”
पुणेकरांनो आपण जी लढाई लढतोय ती कुणा एकाच्या विरोधात नाही तर या बरबटलेल्या सिस्टीमच्या विरोधात आहे.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 27, 2024
द माफिया-१ लाख रुपये
एजंट जॅक्स प्रत्येक आऊटलेटमागे प्रत्येकी 50 हजार रुपये
टू बीएचके- १ लाख
बॉलर- २ लाख
राजबहादूर मिल्स बिमोरा- १ लाख
मिल्ट- १ लाख
टीटीएम रुफटॉप- ५ हजार
स्काय स्टोरी -५० हजार
जिमी दा ढाबा- ५० हजार
टोनी दा ढाबा- ५० हजार
आयरिश- ४० हजार
टल्ली टुल्स- ५० हजार
अॅटमोस्पिअर- ६० हजार
रुड लॉर्ड – ६० हजार
२४ के- दीड लाख
कोको रिको हॉटेल- ७१ हजार रुपये
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run: “‘त्या’ रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, आता हळू हळू जगासमोर येईल”
-“दादागिरीने राजकारण होत नाही, नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते”