Ketaki Chitale : मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही नेहमीच काहीना काही वादग्रस्त वक्तव्य करत असते. त्यातच केतकी काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावरुन शरद पवार समर्थकांनी केतकीवर आगपाखड केली होती. केतकीने पुन्हा वादग्रस्त पोस्ट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक पोस्ट लिहली आहे.
ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच अमोल किर्तीकर यांच्या प्रचारात १९९३ च्या १९९३ च्या बाँम्बस्फोटातील आरोपी दिसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. १९९३ च्या बॉम्बस्फोटचा आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ फिरताना दिसत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. याबाबत केतकीने ही पोस्ट केली आहे.
केतकी चितळेची इन्टग्राम पोस्ट काय?
‘लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय? कीर्तीकरांना तसेच मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१ टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत; येते आहे ती फक्त कीव’, असं म्हणत केतकीने उद्धव ठाकरेंवर संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune | पुण्यात जोरदार पाऊस; राज ठाकरेंची सभा होणार रद्द?
-‘वेळीच सुधारा अन्यथा त्यांचे कामच करून टाकीन’; अजित पवार कोणाला दिला इशारा?
-पाच वर्ष मतदारसंघात फिरकले नाहीत, आता कोल्हे म्हणतात, “अभिनयातून ब्रेक घेतो पण…”
-‘काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा आमच्यासोबत या’; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन मोदींची ऑफर