पुणे : सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला तात्काळ उचाराची गरज असताना देखील अनामत रक्कम मागितली नातेवाईकांकडे पैसे नसल्यामुळे ५ तासानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. २ चिमुकल्या मुलींना जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली. सर्व राजकीय पक्षांकडून आणि विविध संघटनांनी आंदोलने केली. त्यानंतर पुणे महापालिकेने शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांना ‘रुग्णांकडून अनामत डिपॉझिट मागू नये, आधी उपचार आणि मगच पैसे मागावेत’, अशी नोटीस पाठवत आदेश दिले आहेत. मात्र, आता इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने त्याला विरोध केला आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी आणि महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिलेला आदेश या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांची बैठक इंडियन मेडिकल असोसिएशनची पुणे शाखा आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे शाखेने घेतली. या बैठकीत अनामत रक्कम न घेण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसून, अशी सक्ती करता येणार नाही, अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आंदोलन आणि रुग्णालयाचे करण्यात आलेले नुकसान याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. रुग्णालयाची चौकशी अद्याप पूर्ण झालेली असून, त्याआधी त्यांना दोषी ठरवू नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीला पैशांअभावी उपचार केले नसल्याच्या दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमबाबत नुकताच अनामत रकमेबाबतचा आदेश काढला. त्यात रुग्णालयांनी रुग्णाशी सौजन्यपूर्ण व्यवहार करणे आणि आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णाकडून अनामत रक्कम न घेणे, असे दोन प्रमुख मुद्दे होते.
चौकशी पूर्ण होण्याआधी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवू नये. डॉ. सुश्रुत घैसास यांची प्रथमदर्शनी चूक दिसत नाही. महापालिकेने कायदेशीर तरतुदीची चुकीचा अर्थ काढला. नियोजित शस्त्रक्रियेआधी खर्चाचा तपशील सांगणे रुग्णालयांसाठी बंधनकारक आहे, असे खासगी रुग्णालयांनी या बैठकीत भूमिका मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘४० लाख रुपये भरा अन् मृतदेह घेवून जा’; २६ वर्षे रुग्णसेवा केलेल्या डॉक्टरसोबतही ‘दीनानाथ’ची वागणूक
-दीनानाथ रुग्णालयाला पालिकेचा कर भरावाच लागणार; पालिकेने बजावली वसुलीसाठी नोटीस
-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: आरोग्य विभागानं ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर केली मोठी कारवाई
-‘३५ वर्षांपूर्वी ‘दीनानाथ’ला जागा देऊन आम्ही चूक केली का?’ जागेचे मूळ मालक खिलारेंचा उद्विग्न सवाल
-‘रुग्णांकडून कोणतंही डिपॉझिट घेऊ नका’; पालिकेने धाडली सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस