पुणे : पुणे कल्याणीनगर झालेल्या अपघातावरुन राज्यात चांगलेच रान पेटले आहे. या प्रकरणातील नवीन अपडेट आता समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडिल पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे.
शिवाजीनगर न्यायालयामध्ये आज विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना हजर करण्यात आले होते. पुढील तपासासाठी दोघांचीही आणखी चौकशी करणे गरजेचे आहे, असे पोलिसांनी केलेल्या युक्तीवादामध्ये सांगण्यात आले आहे. यावरुन न्यायालयाने विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची पोलीस कोठडी वाढवली आहे. येत्या ३१ मे पर्यंत म्हणजेच आणखी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, एकीकडे पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही लढाई सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे जिल्हा रुग्णालय ससूनमधील डॉक्टरांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होत असून या प्रकरणाने अत्यंत वेगळ्या वळणावर गेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run : “अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे”
-कमी वयात म्हातारे दिसण्याची मुख्य कारणे; चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी
-‘ससूनच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचं रेकॉर्ड काढा अन्…’; सुप्रिया सुळेंची सरकारकडे महत्वाची मागणी