पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना रंगला आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. यातच महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.
‘आगामी लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई नाही. तर ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. देशाचा नेता कोण होईल? हा देश कोणाच्या हाती चालवायला द्यायचा? हे ठरवणारी ही निवडणूक आहे, तेव्हा मत कोणाला द्यायच हे आपण विचार करून ठरवा’, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केले आहे. “बारामतीला कोणीच थांबू शकत नाही. तसंच सुनेत्रा वहिनींना देखील कोणी थांबवू शकत नाही. बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जातील”, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
“मागील २५ वर्ष अजित पवार यांनी मेहनत केली, विकास केला, माणसं जोडली. आज बारामतीचे जे रूप आहे ते अजित पवारांमुळेच आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आगामी लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनीत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई नाही तर लढाई देशाचा नेता निवडण्याची आहे देशाचा नेता कोण होईल? कोणाच्या हाती देश चालवायला द्यायचा? हे ठरवणारी ही निवडणूक आहे”, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
“नरेंद्र मोदी यांनी केलेली १० वर्षातील विकास काम आपण पाहिले आहेत. २० कोटी जनतेला मोदींनी झोपडपट्टीतून पक्या घरांमध्ये आणलं, तरुणांसाठी मोठी मदत केली. महिलांना देखील मदत केली. देशात मोठे उद्योग तयार झाले आणि यासाठी मोदी नेहमी प्रयत्नशील असतात. १२ बलुतेदारांचा व्यवसाय वाढवण्यासाठी देखील मोदी यांनी प्रयत्न केले. मागील १० वर्षे हा फक्त ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी है, पुढच्या पाच वर्षात बदललेल्या भारत आपण पाहू”, असंही फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-“सत्तेचा उन्माद राज्यकर्त्यांनी दाखवून दिलाय, आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही”- शरद पवार
-Shirur Lok Sabha | “तुमच्यामुळे मी तिनदा खासदार झालो, ही माझी शेवटची निवडणूक”- आढळराव पाटील
-“बारामती एक विकासाचं मॉडेल, हा विकास फक्त अजितदादांमुळेच”- सुनेत्रा पवार
-भोरमध्ये सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का, ठाकरे गटाचा नेता थेट पोहचला अजितदादांच्या स्टेजवर