पुणे : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं दिसत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील भाजप आणि आरएसएस संघाचं कौतुक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १२ जानेवारी (रविवारी) शिर्डी येथे भाजपच्या अधिवेशनामधअये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले अमित शहा?
“महाराष्ट्राच्या राजकारणात 1978 पासून शरद पवार यांनी दगा-फटक्याचे राजकारण सुरु केलं. या राजकारणाला जनतेने 20 फूट जमिनीत गाडण्याचं काम केलं. तर उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये आपल्यासोबत विश्वासघात केला. जनतेने त्यांनाही त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता आपल्यासोबतच खरी शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही मोठा विजय झाला आहे.”, असे अमित शहा म्हणाले. अमित शहा यांच्या या टीकेला आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सणसणीत उत्तर दिलं आहे.
“अमित शहा यांनी शरद पवारांवर केलेली टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी दगा फटक्याचं राजकारण सुरू केल्याची टीका त्यांनी केली. मात्र, गेल्या काही वर्षातील भाजपच राजकारण पाहिलं तर देश भरामध्ये अमित शहांनी पक्ष फोडाफोडीचे काम केलं आहे. महाराष्ट्रात देखील त्यांनी दोन पक्ष फोडले असून त्यांचे चिन्ह आणि नाव चोरण्याचा प्रयत्न केला आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
‘घाणेरड्या राजकारणाला जन्म घालणारा नेता’
‘इतर राज्यातही राजकारणाची संस्कृती संपवण्याचे काम अमित शहांनी केलं. अमित शहांच्या जीवनावर जेव्हा केव्हा पुस्तक लिहिण्यात येईल तेव्हा देशातील सर्वात मोठा फोडाफोडीचा जनक आणि घाणेरड्या राजकारणाला जन्म घालणारा नेता म्हणून त्यांची ओळख सांगितली जाईल, अशा शब्दातही प्रशांत जगताप यांनी अमित शहांवर शरसंधान साधलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारताच अजितदादा भडकले, म्हणाले,…
-‘एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही’; शरद पवारांच्या खासदाराला मोरेंनी सुनावलं
-ठाकरेसेना स्वबळावर लढणार; ‘हा तर शिवसैनिकांचा विश्वासघात’
-‘लोकांची काम करण्यासाठी खात्याचं काम…’; अजित पवारांच्या मंत्र्यांना सूचना