पुणे : पुणे शहरातील हिंजेवाडी फेज १ मध्ये कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. बुधवारी आठच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये ४ कर्मचाऱ्यांचा होरुळून मृत्यू झाला तर तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. या बसमध्ये एकूण १२ कामगार होते. याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंजवडीमध्ये लागलेल्या आगीची घटना ही अपघात नसून या घटनेत स्वत: चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता, अशी देखील माहिती समोर आली आहे.
दरम्यान, बसचालकचा दिवाळीत पगार कापला होता आणि त्याच्यासोबत गाडीमध्ये असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी त्याला त्रास दिला होता. म्हणून त्याने हा सर्व प्रकार घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जनार्दन हंबर्डीकर असे या माथेफिरू चालकाचे नाव आहे. बसमध्ये असणाऱ्या तिघांशी वाद होता म्हणून त्यांना मारायचा कट होता. मात्र, त्याने रचलेल्या कटामध्ये ४ निष्पाप बळी गेले तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बारामती नगरपरिषदेतील ‘त्या’ अधिकाऱ्याला रंगे हात पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
-वकिलही निघाला दत्ता गाडेप्रमाणे भामटा; दारु ढोसून पडला मात्र बनाव अपहरणाचा, नेमकं काय घडलं?
-सावधान! पुणे ग्रामीण जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू, उल्लंघन केल्यास…