पुणे : पुणे शहरात गतवर्षीप्रमाणे देशात गृहखरेदीचा जोर कायम असल्याचे यंदाच्या वर्षी पहिल्या ३ महिन्यांत देशातील प्रमुख ८ शहरात मिळून एकूण १ लाख २० हजार ६४० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे या गृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल १ लाख १० हजार ८८० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये ४१ टक्क्यांची वाढ झाली असल्याचा खुलासा प्रॉपटायगर डॉटकॉमच्या रिअल इनसाइट रिसिडेंशीयल-जानेवारी-मार्च २०२४ अहवालातून झाला आहे.
गतवर्षी जानेवारी ते मार्च या ३ महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील ८ प्रमुख शहरांत ८५ हजार ८४० घरांची विक्री झाली होती. देशात पहिल्या तीन महिन्यांत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये सर्वाधिक विक्री मुंबई आणि पुणे येथे झाली असून या शहरांतील गृहविक्रीचा आकडा ६५ हजार ७०० वर पोहोचला आहे. यापैकी मुंबईतील घरांची विक्री सर्वाधिक असून पहिल्या ३ महिन्यांत मुंबईत ४१ हजार ५९० घरांची विक्री झाली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर असून पुण्यात एकूण २३ हजार ११० घरांची विक्री झाली आहे. गृहविक्रीमध्ये यापाठोपाठ हैदराबाद (१४,२९०), अहमदाबाद (१२,९२०), बंगळुरू (१०,३८०), दिल्ली-एनसीआर (१०,०६०), चेन्नई (४,४३०) आणि कोलकाता (३,८६०) या शहरांचा क्रमांक लागतो.
क्षेत्रफळाच्या बाबतीत घरांची विक्री ९९ दशलक्ष चौरसफुटांपासून ६३% वाढून १६२ दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली आहे. यात दिल्ली एनसीआर (१८४ टक्के)सह आघाडीवर असून यानंतर हैदराबाद (१२८ टक्के), अहमदाबाद (१०८ टक्के), कोलकता (४९ टक्के), बंगळुरू (३९ टक्के), मुंबई-एमएमआर (२६ टक्के), पुणे (२१ टक्के), आणि चेन्नई (१६ टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्यकर्माच्या बदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’ म्हणत भोंदूनी डॉक्टरांना घातला ५ कोटींचा गंडा
-“सून म्हणून माझी निवड शरद पवारांनीच केली”; शरद पवारांच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया