पुणे : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना (शुक्रवारी) आज महडमध्ये घडली आहे. सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हे हेलिलॉप्टर आले होते. सुषमा अंधारे आणि हेलिकॉप्टर चालक हे दोघेही सुखरुप आहेत. हे हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागचं कारण आणखी समोर आलेलं नाही.
महाडमध्ये हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच ते क्रॅश झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे राज्यभर फिरत आहेत. त्यांची कोकणामध्ये सभा होती. कोकणातील सभा आटपून त्या बारामतीकडे रवाणा होणार होत्या. मात्र त्या आधीर हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
“मी प्रचासभेसाठी जायचं होतं. दोन ते तीन सभा करायच्या होत्या आणि मंडणगड तसंच रोहा या ठिकाणी जायचं होतं. त्याआधीच ही घटना घडली आहे. महाडची सभा करुन मुक्कामाला थांबले होते. हेलिपॅडजवळ आम्ही होतो. चॉपर येणार होतं. चॉपरने ते दोन ते तीन घिरट्या घातल्या आणि अचानक मोठा आवाज झाला. तसंच धुळीचे लोट उठले. सुरुवातीला नीट काही समजलं नाही. पण आजूबाजूचे सगळे लोक सांगत होते की पुढे जाऊ नका. मला कॅप्टनची चिंता होती की ते सुखरुप आहेत की नाही? मात्र कॅप्टन सुखरुप आहेत. मी आणि माझा लहान भाऊ आम्ही दोघे प्रवास करणार होतो पण आम्ही सगळे सुखरुप आहोत. प्रवास सुरु करण्याआधीच ही घटना घडली.”
महत्वाच्या बातम्या-
-“पुण्याचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी मोहोळांनी केलेले काम कौतुकास्पद” – रामदास आठवले
-कोव्हिशील्ड लसीमुळे मृत्यू अटळ? ऐका ‘या’ प्रसिद्ध डॉक्टरांचं म्हणणं…
-‘…मग अनोळखी उमेदवाराला पाडण्यासाठी मोदींना का यावं लागलं?’; वाघेरेंचा बारणेंना खोचक सवाल
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; मोहोळ म्हणाले, ‘कॉलेज लाईफचा जल्लोष अनुभवला’