पुणे : यंदाच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यात जून महिन्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. जुलै महिन्यात पुन्हा एकदा जोरदार कोसळत आहे. राज्यात पुढील २ दिवस जोरदार पाऊस बरसणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने दर्शवला आहे. येत्या २ दिवस मध्यमहाराष्ट्र, विदर्भ, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस बरसण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेडमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही भागात यलो अलर्ट देखील जारी करण्यात येणार आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण, गोवा कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरेंचा प्रकाश आंबेडकरांना फोन; अन् म्हणाले, ‘साहेब मला माफ करा’ का मागितली माफी?
-उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरेंना ऑफिस फोडण्याची धमकी; पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ
-जेएम कॉर्नर चौपाटी पालिकेकडून जमीनदोस्त; अनधिकृत बांधकामां विरोधात धडक कारवाई सुरूच
-धीरज घाटेंचे राजकीय आचरण मनोरूग्णासारखे, तत्काळ गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी