पुणे : राज्यात गेल्या ८-१० दिवसांपासून विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेर लावली आहे. भारतीय हवामान विभागाकडून पुण्यात २४ मे पर्यंत हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने रविवारी हजेरी लावली होती. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे शहरात दिवसाचे तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे तापमान पुढील काही दिवस कायम असेल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामधे चक्रीवादळाच्या अभिसरणाची स्थिती निर्माण झाली आहे. दुपारपर्यंत तापमानात वाढ जाणवेल आणि दुपारनंतर वातावरणात मोठा बदल जाणवू शकतो. या स्थितीमुळे शहरातील काही भागात सायंकाळच्या वेळी वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे शहरात शिवाजीनगर आणि लोहेगावसह अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावलेली होती.
महत्वाच्या बातम्या-
-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर
-Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…
-आजच आपल्या आहारात सामील करा सुर्यफूलाच्या बिया; आरोग्यासाठी वरदान ठरतील, जाणून घ्या काय आहेत फायदे
-पुण्यात होर्डिंग कोसळल्याप्रकरणी जागामालकासह होर्डिंग कंपनीवर गुन्हा दाखल