पुणे : राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. मार्चच्या अखेरीपासून ते एप्रिल महिना उलटला तरीही उन्हाच्या झळा काही कमी झाल्या नाही याउलट आणखीणच वाढत आहे. या उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुढील ५ दिवस उत्तर भारत, पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण भारतात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण किनारपट्टीवरही ५ दिवस आर्द्रतायुक्त उष्ण तापमान राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात २२ मार्चपासून ४० अंशावर आहे. एप्रिल मध्यात प्रामुख्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पारा ४२ आणि ४३ अंशांवर गेला होता. १९ एप्रिल रोजी अकोल्यात ४४ अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती. मागील ४-५ दिवस तापमान काहीसे कमी झाले होते. आता पुन्हा तापमानात वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
प्रामुख्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशातील तापमानवाढीचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यात दिसून येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवस प्रामुख्याने गंगा नदीचे खोरे, पश्चिम बंगाल, ओडिशा, पूर्व किनारपट्टी आणि दक्षिण भारतात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह परतफेड करणार”- मुरलीधर मोहोळ
-‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेतील विकीचा नवा लूक पाहिला का?
-“मी शेतकऱ्यांची मुलगी अन् बायको, शेतकऱ्यांची कळकळ मला समजते, तुमच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन”
-लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी; वाकडमध्ये २७ लाखांची रोकड जप्त
-‘पाच वर्षात लोकांची काम केली नाही, आता लोक खासदारांना वेशीवरून माघारी पाठवतायत’- आढळराव पाटील