Health Update : उन्हाळा म्हटलं की घाम आलाच. प्रचंड प्रमाणात घाम येणं, उच्च तापमान दीर्घकाळ उन्हात राहणं व शारीरीक हालचाली अशा विविध कारणांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे पारंपारिक पद्धतीनुसार फक्त पाणी पिणं शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी पुरेसं ठरत नाही. “पुरेशा प्रमाणात प्यायल्यानंतरही इतर विविध कारणांमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते”, असे तज्ञांचे मत आहे.
राज्यात सध्या उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. तापमानाचा पारा सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे उष्माघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. डीहायड्रेशन होऊ नये म्हणून शरीरात पाण्याची पुरेशी पातळी राखणे महत्वाचे आहे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी जी कमी होत असते ती पाण्याची पातळी राखण्यास मदत होते, असे अनेकांना वाटते मात्र,
शरीराला आवश्यक प्रमाणात पाणी पिऊनही निर्जलीकरणाची लक्षणं जाणवू शकतात. ज्यामध्ये थकवा, चक्कर येणं, तोंड कोरडं पडणं, लघवीचं प्रमाण कमी होणं अशा लक्षणांचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीनं दिवसभरात दोन ते अडीच लिटर पाणी प्यायलं तरी ते शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी पुरेसं नाही. कारण- व्यक्तीला भरपूर प्रमाणात घाम येतो, असे आहार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आपल्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड हे खूप प्रभावीपणे काम करते. जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा आपल्या शरीरातील पाणी आणि सोडियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सदेखील कमी होतात. त्यामुळे मिठाच्या सेवनाने गमावलेलं सोडियम भरुन काढलं जातं आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्याची क्षमता सुधारु शकते. त्यामुळे निर्जलीकरण टाळता येते.
हे ही एकदा वाचाच
-पुणेकरांनो, काळजी घ्या! वाढत्या उन्हामुळे सोसाव्या लागतायेत ‘उष्माघाता’चा झळा
-Health Update | वाढत्या उष्णतेचा त्रास होतोय, मग रोजच्या जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश