Milk : शारिरीक स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी रोजच्या आहारात दुधाचा समावेश असावा. दुधामध्ये असणारे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शिअम आयुष्यभर हाडे मजबूत ठेवते. दुधामुळे आपल्या शरीराला उर्जा तर मिळतेच सोबतच अनेक आजारांपासून संरक्षणही करते. अशा असंख्य फायद्यांमुळे अनेक जण रोजच्या आहारात दुधाचा समावेश करतातच. दुधामुळे होणाऱ्या असंख्य फायद्यांमुळे अनेक नियमित दूध पितात. मात्र, नियमीत दूध पिले तरीही अनेक लोकांना फायदे मिळत नाहीत. चूकीच्या वेळी दूध पिल्याने दूधाचे फायदे होताना दिसून येत नाही.
मजबूत हाडे आणि दात: दूध हे कॅल्शियम आणि ‘व्हिटॅमिन डी’चा महत्वाचा आणि नैसर्गिक स्रोत आहे. म्हणून दूधाच्या नियमित सेवनाने आपली हाडे मजबूत होतात आणि दातांसाठी दुधाचा फायदा होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: आपल्या शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्वे आणि खनिजे हे आपल्याला दुधापासून मिळतात. दुधामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन बी-१२ देखील असतं. जे आपल्या आपली निरोगी प्रतिकारशक्ती वाढवून आपल्याला आजारापासून आपल्या शरीराचे संरक्षण करते.
हायड्रेटेड करते: सध्या उन्हाळा प्रचंड जाणवत आहे. अशात आपण आपल्या शरिराला हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. शरिराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आवश्यक द्रवपदार्थांच्या सेवनात दुधाची जोड दिल्याने पोषणासह हायड्रेटेड राहण्यास मोठी मदत होत असते.
स्नायूंसाठी पॉवरहाऊस: दुधामधील प्रथिनांचे प्रमाण स्नायूंच्या वाढीमध्ये आणि दुरुस्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यामुळे दररोज एक ग्लास दुधाचे सेवन हे स्नायूंना बळकट करू शकते. व्यायाम करणाऱ्या किंवा स्नायूंचा आकार वाढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी दूध फायदेशीर ठरू शकते.
नियमित दूधाचे सेवन केल्याने हाडे कमकुवत करणारी स्थिती (ऑस्टियोपोरोसिस) आणि हृदय तसेच रक्तवाहिन्यांसंबधी रोग दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यासाठी मदत होते.
दूध पिण्याची योग्य वेळ कोणती असावी?
दूध पिल्याने अनेक फायदे आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र अनेकांनी दूध पिऊनही काही फायदा होत नसल्याचं सांगितलं. याचे मूळ कारण आहे ते म्हणजे दूध पिण्याची योग्य वेळ असते. वेळी अवेळी दूध पिले तर काही फायदा होत नाही. डाॅक्टर रात्री दूध पिण्याचा सल्ला देतात.
रात्री दूध प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. त्यामुळे आपले शरीर हे दुधातून जास्तीत जास्त कॅल्शियम शोषून घेते. मात्र, दिवसभरातही दूध प्यायल्यास काहीही नुकसान होत नाही. फक्त फायदे जास्त होत नाहीत. ‘रिकाम्या पोटी दूध पिणे शक्यतो टाळावे. कारण रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या होऊ शकतो. पचनासंबंधी समस्या असणाऱ्यांनी याबाबत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे’, असे डॉक्टरांच्या मत आहे.
दूध पिल्याने होणारे फायदे आता आपण पाहिले मात्र सिंघवाल यांच्या माहितीनुसार काही विशिष्ट स्थितींमध्ये लोकांनी दूध पिण्याचे प्रमाण कमी ठेवायला हवे. कारण काही लोकांच्या शरीरात दुधात आढळणारी साखर पचवण्यासाठी आवश्यक असलेल्या लॅक्टेज एन्झाइमची कमतरता असते. यामुळे दूध प्यायल्याने पोट फुगणे, गॅस आणि अतिसार यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांनी दूध कमी प्रमाणात प्यावे.
काही लोकांना दुधातील प्रथिनांचे पचन कठीण होऊ शकते. ज्यामुळे पुरळ, अंगावर पित्ताच्या गाठी येणे असे त्रास होऊ शकतात. दुधाची अॅलर्जी होऊ शकते. दुधात सॅच्युरेटेड फॅट्स असतात, ज्या मुळात घातक नसल्या तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने हे फॅट्स हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतात. ज्यांना अगोदरच हृदयविकारांचा त्रास आहे अशा लोकांनी किंवा उच्च कोलेस्ट्रॉल अतिप्रमाणात आहे अशा लोकांनी जास्त फॅट्स असणारे दूध पिणे शक्यतो टाळावेच.
महत्वाच्या बातम्या-
-अखेर अदिती राव आणि सिद्धार्थ अडकले विवाह बंधनात! तेलंगणामधील मंदिरात गुपचूप उरकला लग्नसोहळा
-वसंत मोरे मराठा समाजाचे उमेदवार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा; मोरे बैठकीतून तडकाफडकी निघाले
-Pune Lok Sabha | मोहोळांची ताकद वाढली! मुरलीधर मोहोळांच्या पाठिशी आता संजय काकडेंचेही बळ
-बारामतीच्या राजकारणात मोठी घडामोड; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार पुन्हा येणार एकत्र!