Health : अनेकांना उष्णतेमुळे अनेक समस्या असतात. काहींना उष्णतेमुळे तोंडातील जखमा किंवाा अल्सर काही वेळा खूप त्रासदायक असतात. तोंडात झालेल्या जखमांमुळे अनेकांना काहीही खाताना किंवा पिताना कठिण होते. आपल्या पोटात झालेल्या उष्णता, व्हिटॅमिनची कमतरता, जास्त ताण, संसर्ग किंवा इतर आरोग्य समस्या अशा अनेक कारणांमुळे तोंडात अल्सर होऊ शकतो.
आपल्या पोटाच्या उष्णतेमुळे होणाऱ्या तोंडामध्ये येणाऱ्या फोडांबाबत माहिती घेणार आहोत. जेव्हा आपल्या पचनक्रियेमध्ये काही गडबड होते, तेव्हा त्याची लक्षणे तोंडात अल्सरच्या रूपात देखील दिसू शकतात. अशा समस्येत तुम्ही काही घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक गोष्टींनी उन्हाळ्यात तुमचे पोट थंड ठेवू शकता.
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा आणि तोंड साफ करा. मिठात जंतुनाशक गुणधर्म असतात, जे अल्सर लवकर बरे होण्यास मदत करतात.
तोंडात आलेल्या फोडांपासून सुटका करण्यासाठी मध आणि हळदीचे एकत्रित सेवन करावे. मध आणि हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेट्री गुणधर्म असतात. यासाठी एक चमचा मधात चिमूटभर हळद मिसळून त्याचे सेवन करावे.
पोटात अतिप्रमाणत उष्णता झाल्यामुळे तोंडामध्ये फोड अल्सर येतात. अशावेळी दह्याचे सेवन केल्याने फायदा होतो. तसेच थंड ताकही पिऊ शकता. किंवा थंड दही खाऊ शकता. ज्यामुळे पोटात थंडावा आणि खूप आराम मिळेल. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे संक्रमणाशी लढण्यास मदत करतात.
पोटातील उष्णतेमुळे तोंडाच्या फोडांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची काही पाने चावा आणि नंतर पाणी प्या. तुळशीमध्ये अँटीबॅक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे अल्सरमधील जंतू नष्ट होतात आणि अल्सरपासून लवकर आराम मिळतो.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे अपघात प्रकरणावर धंगेकर म्हणाले, ‘फडणवीसांनी अजित पवारांचे हात पाय बांधून…’
-अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार जाहीर
-पुणे हिट अँड रन प्रकरणावर बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, ‘जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती..’
-सेना-भाजपमध्ये ठिणगी; ‘अमित शाहांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिलंय, त्यामुळे दरेकरांनी….’