Health Update : आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण व्यायाम, प्राणायम, योगासने करत असतात. पण या सगळ्यासोबत आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी गरजेचा असतो आपला आहार. तो फक्त आहार नाही तर उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. आपल्या शरिराला प्रथिनांची आवश्यकता असते. प्रथिनांना अनेकदा पोषक तत्वांचा राजा म्हणतात. प्रथिनांममुळे आपल्या शरिरातील स्नायूंची दुरुस्ती, वाढ, प्रतिकारशक्ती, संप्रेरक नियमन म्हणजेच हार्मोन्स संतुलन आणि वजन नियंत्रण यासह आपल्या शरीराच्या कार्यांमध्ये त्याची बहुउद्देशीय भूमिका असते.
आपल्या दिवसाची सुरवात ही नाश्त्यापासून होते. नाश्ता हा तुमच्या उर्वरित दिवसासाठी तुम्हाला तयार करतो. मग, प्रथिनेयुक्त जेवणाने त्याची सुरुवात करावी. अंडी, दही, सोया उत्पादने आणि वाटाणा यासारख्या प्रथिनांचा समावेश शक्यतो सकाळच्या नाश्त्यामध्ये करावा. फळे, भाज्या आणि दूध किंवा बदामाच्या दुधासारख्या पदार्थात प्रोटिन पेस्ट किंवा पावडर मिसळून तुम्ही स्मूदी बनवू शकता.
साखरयुक्त किंवा कार्बयुक्त स्नॅक्स घेण्याऐवजी प्रथिनेयुक्त स्नॅक्सचा जेवणामध्ये समावेश करावा. ज्यामुळे तुमचे पोटही भरेल आणि तृप्तता लाभेल. बदाम, शेंगदाणे आणि भोपळ्याच्या बिया यांसारखे नट्स आणि बिया हे प्रथिनांचे सोयीस्कर स्त्रोत आहेत.
आपल्या जेवणाच्या वेळी आपल्या ताटामध्ये साधारण एक चतुर्थांश प्रथिनयुक्त पदार्थांनी भरलेले असावे. आपल्या जेवणामध्ये चिकन, मासे, टोफू, बीन्स, कडधान्य, सोया उत्पादने किंवा वाटाण्याचा समावेश असावा. हे केवळ तुमच्या प्रथिनांचे सेवन वाढविण्यास मदत करत नाही, तर तुम्हाला दिवसभर संतुलित पोषण मिळेल हे देखील सुनिश्चित करते.
महत्वाच्या बातम्या-
-‘आई तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे’; कठीण काळात राखीला आठवली आई, लवकरच होणार शस्त्रक्रिया…
-अभी भी दिल जवान है! भोरच्या आजोबांचा असा काही साजरा केला १११ वा वाढदिवस…
-आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! आयफोनच्या ‘या’ मॉडेलवर मिळतेय 22 हजार रुपयांची सूट
-आधी धंगेकर आता भाजप अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, पोलीस ठाण्याबाहेरील राडा भोवणार
-हजारो कोटींच्या बेटिंग अॅपच पुणे कनेक्शन, ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल अन् ४५२ बँक पासबुक; नेमका विषय काय?