Rainy Season and Milk : पावसाळ्यात आपल्याला जरी उष्णतेपासून दिलासा, गारवा मिळत असला तरी प्रत्यक्षात या दिवसांमध्ये प्रत्येकाने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात अनेक आजारही ओढवतात. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हा ऋतू आणखी आव्हानात्मक मानला जातो. पावसाळ्यात, विषाणू आणि बॅक्टेरियामुळे संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, म्हणून आपण सर्वांनी स्वच्छता आणि खाण्याच्या सवयींबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
सामान्य हवामानात आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींना पावसाळ्यात कमी खाण्याचा किंवा पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. दूध देखील पावसाळ्यात आपल्या शरिरासाठी हानीकारक ठरते. पावसाळ्याच्या दिवसात दुधाचे सेवन कमी करावे कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते, असे आयुर्वेद तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात दूध का पिऊ नये?
पावसाळ्यात दूध, दही यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करावे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
या मोसमात दुग्धजन्य पदार्थांमध्ये जंतू वाढण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्यात दही खाणे देखील आयुर्वेदात फायदेशीर मानले जात नाही.
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात वात वाढतो आणि पित्ताचा संचयही होतो. दह्याचा कूलिंग इफेक्ट असतो, त्यामुळे पावसाळ्यात दही खाऊ नये.
पावसाळ्यात दही खाल्यामुळे कमकुवत पचनसंस्था असलेल्या लोकांमध्ये पचना संबंधित समस्या वाढू शकतात आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना सर्दी आणि फ्लू होऊ शकतो.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही रोज दूध पीत असाल आणि पावसाळ्याच्या दिवसातही त्याचे सेवन चालू ठेवायचे असेल तर काय करावे?
दुधात चिमूटभर हळद मिसळून याचे सेवन करू शकता. यामुळे दुधाची ताकद तर वाढतेच पण पावसाळ्यात होणाऱ्या अनेक संसर्गजन्य आजारांचा धोकाही कमी होतो कमी.
हळदीचे दूध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुषमा अंधारे यांनी दिलेल्या ऑफरवर रुपाली ठोंबरे म्हणाल्या, ‘त्या माझ्या मैत्रीण…’
-जगताप दीर भावजईच्या वादात भाजपच्या निष्ठावंताने घेतली उडी; केला ‘हा’ गंभीर आरोप
-खासदार निलेश लंकेंची कुख्यात गँगस्टरसोबत भेट, राजकीय वर्तुळात खळबळ
-राजकारणात बारामतीच श्रीमंत; एकट्या पवार कुटुंबात इतकी पदे
-महायुतीत तिढा; पुण्यातील ‘या’ २ जागांवर अजित पवार गटाचा दावा, भाजपची काय भूमिका असणार?