तळेगाव: मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा समारोप आज करण्यात आला. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या शिबिरात जवळपास ४७ हजारांच्यावर नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यंदा या शिबीराचे सातवे वर्षे असून डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कान्हे उपजिल्हा रूग्णालय येथे शिबीर पार पडले. त्यावेळी शेळके यांच्या वतीने गेली सात वर्षांपासून अविरतपणे होत असलेल्या शिबिराचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
महाआरोग्य शिबिरात नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. शिबिरामध्ये नागरिकांची मोफत तपासणी, आरोग्य सल्ला आणि आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांनी समर्पण भावाने काम करत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. या शिबिरात एमआरआय तपासणी, सीटी स्कॅन तपासणी, सोनोग्राफी, एक्स रे, रक्त तपासणी, चष्मे, औषधे, श्रवण यंत्र या सुविधांबरोबरच मोफत रुग्णावहिका सेवाही देण्यात येत आहे. तर शिबिरीच्या अंतर्गत ह्यदयाच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया, मोदीबिंदू, हांडाचे डॉक्टर, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया याचसह तब्बल २५ प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले.
बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हेच उद्या एखाद्या मोठ्या आजाराला निमंत्रण देणाऱ्या असू शकते. त्यामुळे ‘निरोगी मावळचे’ उद्दिष्ट ठेऊन गेली ७ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुदृढ आरोग्याच्या उन्नतीसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) दिली आहे.