पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवानेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. पुणे दौऱ्यावर असताना अमित ठाकरेंनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अनौपचारिक गप्प्यांच्या कार्यक्रमामध्ये अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्यही केले. यावेळी त्यांनी मनसेतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळवलेले वसंत मोरे यांच्या बाबतही भाष्य केले आहे.
“वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचं आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे”, असे अमित ठाकरे म्हणाले आहेत. वसंत मोरेंनी नुकताच मनसेला रामराम केला आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याविषयी बोलताना अमित ठाकरेंनी मोरेंना टोला लगावला आहे.
“देशात पुन्हा मोदी सरकार येणार आहे. मोदी सरकारला ३०० च्या आसपास जागा मिळतील. राजसाहेबांनी कार्यकर्त्यांचा विचार करुनच बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय घेतला असणार. लोकसभा निवडणुकीत मनसेचे जे पदाधिकारी महायुतीविरोधात प्रचार करतील त्यांच्यावर कारवाई होणार”, असे अमित ठाकरे यांनी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Shirur Lok Sabha | ‘हे तर दुसरे संजय राऊत’; आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर निशाणा
-‘तुम्ही सून असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही’; अजित पवारांनी पुन्हा काकांना डिवचलं
-“ईव्हीएमचे बटन कचाकचा दाबा पण, बटन दाबताना हात आखडता घेतला तर माझा पण…”- अजित पवार