पुणे : इंदापूर विधानसभा मतदारसंघातील निमगाव केतकी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवारांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी बोलताना अजित पवारांनी ‘हर्षवर्धन पाटलांसोबत कोणीतरी राहू द्या नाहीतर लगेच प्रचार करतील’ असं अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढला. यावर हर्षवर्धन पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘मला एकटं पाडण्याचा, कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तीस-पस्तीस वर्षाच्या राजकारणात अनेकांना मी मोठे केलं. ते आज ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोडून जात आहेत. पण तालुक्यातील जनता उघड्या डोळ्यांनी बघत असून मतदार हुशार आहे. निकालातून जनता चोख उत्तर देईल’, अशा शब्दात हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.
“अजित पवार इथे आल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेने ठरवलेलं आहे, ते आलेत म्हणजे काहीतरी बोलणारच. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची फार काही दखल घेण्याची गरज नाही आणि कोण-कोणाबरोबर राहील आणि कोणाचा विजय होईल? हे लवकरच कळेल. घोडा आणि मैदान लांब नाही त्यामुळे इंदापूर तालुक्यातील स्वाभिमानी जनता आहे त्यांनी हे सर्व चाललेलं पाहिलंय. आयाराम गयारामचा जो कार्यक्रम सुरू आहे तो कशासाठी? त्याबाबत लोक विचारतात”, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी: १५०० नाही तर आता मिळणार २१०० रुपये
-‘विकास पाहिजे तर आबाच पाहीजे’ म्हणत आबा बागुलांच्या विकास यात्रेने पर्वती दुमदुमली
-‘दस में बस’ला पुणेकरांची पसंती; हेमंत रासनेंचा दावा
-“देवा भाऊ, दाढी भाऊ, जॅकेट भाऊ अन् जाऊ तिकडं खाऊ”; ठाकरेंची तोफ धडाडली
-‘पुढच्या तयारीसाठी सर्वांना संधी द्यावी’; नातवासाठी आजोबांचा मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका