पुणे : येऊ घातलेल्या निवडणुकांच्या तारखा कधाही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक नेत्यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चिन्हे दिसत असतानाच पक्षांतर करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपला रामराम करुन ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यावरुन आता इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतली.
‘आयात उमेदवाराला संधी देऊ नका’, अशी मागणी त्यांनी यावेळी केल्याची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी कार्यकर्त्यांसह शरद पवारांची भेट घेतली आहे.
‘तुम्ही द्याल तो उमेदवार निवडून येईल, आपण चुकीचा निर्णय घेऊ नका’, अशी विनंती यावेळी दशरथ माने यांनी शरद पवारांकडे केली आहे. तर ‘सहा जण उमेदवार आहेत. कुणालाही उमेदवारी द्या, ज्यांनी ज्यांनी ताईंना विरोध केला आहे त्यांना आम्ही घरी बसवू’, असा विश्वास यावेळी आप्पासाहेब जगदाळे यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळात ‘महाआरोग्य’ शिबिराला उदंड प्रतिसाद! आमदार शेळकेंच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक
-हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी घेणार मोठा निर्णय
-‘राजगडला अडचणीत आणणाऱ्यांचा बंदोबस्त’; संग्राम थोपटेंचा रोख नेमका कोणाकडे?
-‘लाडकी बहिण, लाडकी लेक योजना राबवता, पण…’; शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड
-पुणे महापालिकेच्या निधी वाटपातही ‘लाडकी पदाधिकारी योजना?’ महायुतीत खडाखडी