पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला.
‘आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत आहे’, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहे. हर्षवर्धन पाटलांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आता हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
‘मी हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतल्याचे पाटील म्हणाले. इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दुसरा पर्याय काढू असे फडणवीस म्हणाले. पण दुसरा पर्याय स्वीकारणे कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. व्यक्तिगत तो निर्णय योग्य ठरला असता, पण जनतेचा प्रश्न असतो’, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी? पवारांचे निष्ठावंत दुखावले, मानेंची आक्रमक भूमिका
-अंकिता पाटील कापणार भाजपचे दोर; आजच देणार पदाचा राजीनामा
-पुण्यात महिला असुरक्षितच; मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीसोबत….
-‘झापूक-झुपूक’नंतर आता ‘डंके की चोटपर’; गुनरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात
-वडिलांना की मुलाला उमेदवारी कोणाला? पुण्यात दोन मतदारसंघात ‘फॅमिली ड्रामा’